फरासखाना पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या मध्य प्रदेश व नाशिक जिल्ह्यातील टोळी पैकी दोन आरोपींना अटक करण्यात फरासखाना पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून २,७९,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ सप्टेंबर रोजी फिर्यादी (रा. येरवडा, ता. खेड, जि. पुणे) हे त्यांच्या भावासोबत बेलबाग चौक, पुणे येथे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते.
दुपारी शिवाजी रोड, बेलबाग चौक, बुधवार पेठ, पुणे येथील लोखंडी बॅरेकेटजवळ सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून मिरवणूक पाहत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल कोणीतरी चोरल्याची तक्रार फिर्यादीने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदारांना गुन्ह्याचा तपास करून मोबाईल चोरांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकातील अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन जाधव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेश व नाशिक जिल्ह्यातील टोळीतील १) फैसल अजीज खान (वय २२, रा. रमाबाई नगर, मनमाड, जि. नाशिक) २) कालू राजू पारधी (वय २५, रा. सुहागपूर, जि. ओसंगाबाद, मध्य प्रदेश) अशा दोन आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून अंदाजे २,७९,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे २१ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबूब मोकाशी, उत्तम कदम, पोलीस अंमलदार तानाजी नागरे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, बाळासाहेब चव्हाण, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर आणि पोलीस अंमलदार रेखा राऊत यांनी पार पाडली.
आरोपींची चोरी करण्याची पद्धत :
अटक आरोपी गणेश उत्सवातील गर्दीचा फायदा घेत पुणे शहरात येऊन भाविकांच्या खिशातील महागडे मोबाईल चोरायचे. चोरी केल्यानंतर ते तत्काळ सिमकार्ड काढून मोबाईल फोन बंद करून ठेवायचे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींना वेळेवर अटक करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात होणारी चोरी टाळण्यात यश आले आहे.