खडी मशीन चौकाच्याजवळ अपघात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना खडी मशीन चौकाजवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ हा अपघात झाला. क्रेन चालक भगवान देवकर (वय ४१, रा. औरंगपूर, बीड) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी जेताराम जात हे दुचाकीवरून जात होते.
त्यांच्यासह चंदाराम तेजाराम चौधरी (वय ३५, रा. भेकराईनगर, पुणे) होते. क्रेनच्या धडकेने ते खाली पडून गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार दिनेश रासकर करत आहेत.

