अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली पॅन कार्ड नंबर घेऊन एका महिलेची १७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी एरंडवणे येथील तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला आहे. अनोळखी तरुणाने तिच्याशी संपर्क साधून, क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली पॅन कार्ड नंबर घेऊन १७,१०,००० रुपयांची फसवणूक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण या प्रकरणाचा करीत आहेत.

