सिंहगड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर्स खरेदी-विक्रीत मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखवून धायरीतील एका तरुणाची तब्बल ६३ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अनोळखी लोकांनी धायरीतील फिर्यादीला आपण एका नामांकित बँकेचे सिक्युरिटीज स्टॉक अॅनालिसिस कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीला बँकेचे अॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतर, शेअर्स आणि आयपीओ खरेदी-विक्री करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि ६३ लाखांचा गंडा घातला. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

