महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : महाराष्ट्र राज्याचे एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार भरत गोगावले यांनी आळंदी येथील श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघामध्ये प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. व प. पू. विजयस्मिताजी म. सा. यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद मिळवले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुरेश (काका) वडगांवकर यांनी संघाच्या वतीने आमदार भरत गोगावले यांचा सत्कार केला. त्यावेळी ज्येष्ठ सदस्य मदनलाल बोरुंदिया, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, हरिभक्तपारायण शिवव्याख्याते आकाश म. भोंडवे, अनिल वडगांवकर आणि सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मनोगतात संघाच्या कार्याचे कौतुक केले. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांनी भरत गोगावले यांना आशीर्वाद देताना सांगितले की, जो संत वचनानुसार धार्मिक प्रवृत्तीने काम करतो, त्याच्यासोबत यश येते.
आपल्या पुण्याई मुळेच आपणास हे आमदार पद व महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले आहे. याचा वापर आपण समाजासाठी चांगल्या पद्धतीने करा. चांगले काम करत राहा, समाजाची सेवा करा. आपणास निश्चितच यश मिळेल, असा आशीर्वाद दिला.

