महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन जिमखाना येथील एस.एस. जैन फिरोदीया होस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगलेला मेळावा अत्यंत आनंददायी ठरला. यावेळी होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड. प्रकाश सोळंकी यांचा सन्मान करण्यात आला.
एस. एस. जैन फिरोदीया होस्टेलमध्ये १९८४ ते ९० या कालावधीत शिक्षणासाठी राहिलेले माजी विद्यार्थी तब्बल ३४ वर्षांनंतर २२ सप्टेंबर रोजी एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थी अँड. प्रकाश सोळंकी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जमलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद लुटला. आज हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. सन्मानपत्राचे सुंदर डिझाईन व शब्दरचना माजी विद्यार्थी अक्षय लुणावत यांनी केली, तर सन्मानपत्राचे वाचन प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट किशोर गांधी यांनी केले.
या मेळाव्याच्या आयोजनात किशोर गांधी, अभय लुणावत, मनोज शिंगवी व संजय चोरडिया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सुनील नहार, नितीन बेदमुथा, मनोज चोरडिया, अँड. अनील कांकरीया, अँड. महावीर श्रीश्रीमाळ, अँड. मदन श्रीश्रीमाळ, सुभाष गांधी, सुभाष बोरा, शांतीलाल सोळंकी, संजय बोरा, गोकुळ गुगळे, सुरेंद्र बेदमुथा, अँड. अमृत गुंदेचा, विपीन बोरा, अनील मुथा, महेश सोनी, सचिन बोरा, दीपक बाफना, विजय सांकला, डॉ. रवींद्र छाजेड, शैलेश बोथरा, शैलेश गुंदेचा, राजकुमार नहार, संतोष बेदमुथा, आनंद लुणीया, संजय चेंगेडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

