शांतीलाल मुथ्था : जितो “सुहाना कॉफी टेबल मीटचे” आयोजन
पुणे : जैन समाजात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती एक उद्योजक म्हणून जन्म घेतो. तुमच्या कडे जर आत्मविश्वास आहे तर आपले शिक्षण काय आहे याला महत्त्व नाही.तुमच्या आत्मविश्वसाच्या बळावर तुम्ही या जगात यशस्वी होऊ शकता. असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. जितो पुणेच्या कॉफी टेबल कमिटी च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“सुहाना कॉफी टेबल मीट विथ शांतीलालजी मुथ्था “या कार्यक्रमाचे आयोजन 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता मुथ्था चेंबर सेनापती बापट रोड, पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी बोलताना शांतीलाल मुथ्था यांनी सांगीतले की प्रत्येक नैसर्गिक आपत्ती मध्ये जैन समाज आपल्या देशवासीयांसोबत उभा असतो.
अशा जैन समाजाची चुकीची बनवलेली इमेज बदलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सोशल वर्क करण्यासाठी आधी आपण पैसे कमवा नंतर सोशल वर्क करा असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
जीतो पुणे चे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, व्हाइस चेअरमन अजय मेहता, चेतन भंडारी, विनोद मांडोत, विशाल चोरडिया चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबीया, दिलीप बीनाकीया, रुपेश कोठारी, विशाल शिंगवी, कॉफी टेबल मीट कमिटीचे डायरेक्टर अभिजीत डुंगरवाल, किशोर ओसवाल, संजय संघवी, प्रसन्न मेहता, अनिल भंसाळी, आनंद मेहता, राजेंद्र ललवानी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना शांतीलाल मुथ्था यांनी भूकंप, सामुदायिक विवाह, कोरोना काळात केलेले काम, पाणी फाउंडेशन चे काम, मूल्य वर्धन शिक्षणाचा उपक्रम, देशातील 100 जिल्हे दुष्काळ मुक्त करण्याचे सुरु असलेले काम अशा विविध कामा विषयी जीतो सदस्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला जीतोचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, रविंद्र सांकला, मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड, सचिन जैन, संजय जैन, जयेश फुलफगर, पूनम ओसवाल, अचला भंडारी, गौरव भाटीया, संयोग बोरा यांच्यासह जीतोचे सुमारे 80 हून अधिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
