सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पोलीस आयुक्तांकडून कौतुक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंतरराज्य टोळीकडून जप्त केलेले १७ लाख ८२ हजार ४७९ रुपयांचे ६५ मोबईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दुकानदारास परत करण्यात आले आहे.
चव्हाणनगर येथील कमानी शेजारी श्रीराम कम्युनिकेशन या नावाने मनोज झंवर यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. २३ व २४ जुलै २०२४ च्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
दुकानातील २९ लाख ६४ हजार ५९६ रुपयांचे ९५ मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेले. या गुन्ह्याच्या तपासात सहकारनगर पोलिसांनी मोबीन मुन्ना देवान (वय ३६, रा. बसनगर, घोडासन, बिहार), अरुण किशोरी सहा (वय ५२, रा. मोतीहारी मठिया डीह, छतावणी, बिहार), शमसाद आलम सरजउल अन्सारी (वय ३६, रा. अठमुहाण, मोतीहारी झादौखद, बिहार) यांना अटक करुन त्यांच्याकडून १७ लाख ८२ हजार ४७९ रुपयांचे ६५ मोबाईल फोन जप्त केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते माबाईल शॉपीचे मालक मनोज झंवर यांना हे मोबाईल परत करण्यात आले.