महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. डी. व्ही. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डी. डी. बोराडे, तसेच काटे, अतुल सुरवसे, संतोष शिंदे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य डॉ. शिंदे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
