उपाध्यक्षपदी अॅड. समीर भुंडे, अॅड. सुरेखा भोसले : सचिवपदी अॅड. पृथ्वीराज थोरात, अॅड. भाग्यश्री गुजर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वकिलांची प्रमुख संघटना असलेल्या पुणे बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अॅड. हेमंत झंजाड यांनी अध्यक्षपद पटकावले. उपाध्यक्षपदी अॅड. समीर भुंडे आणि अॅड. सुरेखा भोसले, तर सचिवपदी अॅड. पृथ्वीराज थोरात आणि अॅड. भाग्यश्री गुजर विजयी झाले. खजिनदारपदी अॅड. इंद्रजित भोईटे, तर ऑडिटरपदी अॅड. केदार शितोळे यांची निवड झाली आहे.
पुणे बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. हेमंत झंजाड यांना ३३२९ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अॅड. नलावडे यांना १७१४ मते मिळाली, त्यामुळे १६१५ मतांनी झंजाड विजयी ठरले.
बार असोशिएशनच्या नवीन कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदासाठी अॅड. समीर भुंडे, अॅड. सुरेखा भोसले, सचिवपदासाठी अॅड. पृथ्वीराज थोरात,
अॅड. भाग्यश्री गुजर, खजिनदार : अॅड. इंद्रजित भोईटे, ऑडिटर : अॅड. केदार शितोळे, कार्यकारिणी सदस्य : अॅड. मावाणी पुनम, अॅड. पवार माधवी, अॅड. नेवाळे भारती, अॅड. पवार प्रशांत, अॅड. श्रीकांत चोंधे, अॅड. प्रसाद निगडे, अॅड. स्वप्नील जोशी, अॅड. आकाश गलांडे, अॅड. राज खैरे, अॅड. गणेश माने यांची निवड झाली आहे. ही नवीन कार्यकारिणी पुणे बार असोशिएशनच्या विकासासाठी कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
