• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सन्मानित ‘दीपस्तंभां’चे कार्य ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना प्रेरक व ऊर्जादायी

February 10, 2025
0
10 2 25 1
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : “इतिहास उज्जवल कार्याने लिहिला जातो. त्याग, बलिदान व समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या ‘सूर्यदत्त’ संस्थेचा हा सन्मान सोहळा प्रेरक आहे. यातून भविष्यातील चांगला नागरिक घडवण्याचे कार्य होत आहे. देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य ‘सूर्यदत्त’ संस्था व चोरडिया दाम्पत्य करीत आहे,” असे प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आचार्य लोकेश मुनी यांनी केले. मूल्याधिष्ठित, सर्वांगीण विकासाच्या शिक्षणासाठी कार्यरत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कौतुक वाटते, असेही आचार्य लोकेश यांनी नमूद केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २७ व्या वर्धापनदिनी २३ व्या ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात डॉ. आचार्य लोकेश मुनी बोलत होते.

बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित समारंभावेळी परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा, सिस्टर लुसि कुरियन, लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे, संगीतकार अबू मलिक, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह सूर्यदत्त’च्या सर्व विभागांचे संचालक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांना ‘सूर्यभूषण ग्लोबल पीस अवॉर्ड २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर, अवकाश शास्त्रज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र भंडारी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सीए डॉ. अशोककुमार पगारिया, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग बीर, वैद्यकीय सामाजिक सेवा प्रदान करणारे डॉ. सदानंद राऊत, उद्योजक मयूर वोरा, मयूर शाह यांना, तर सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार, माजी खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा, अभिनेत्री स्मिता जयकर, क्रस्ना डायग्नोस्टिकचे राजेंद्र मुथा, जागतिक व्यापार तज्ज्ञ सागर चोरडिया, सहकार तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव डोले, प्रेरक वक्ते राहुल कपूर जैन, उद्योजक इंद्रनील चितळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया, कृषी उद्योजक सुनील वाघमोडे यांना, तर ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’ स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी जैनम व जीविका जैन यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले खास उपरणे, मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले. डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, “दृष्ट लागण्यासारखा हा कार्यक्रम असून, सूर्यदत्त ही शिक्षण क्षेत्रातील जगन्मान्य अशी संस्था आहे.

या संस्थेकडून आम्हाला सन्मानित करण्यात आले, याचा आनंद वाटतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ध्येयावर ही संस्था काम करते. ज्ञान संपादन करण्याचे कार्य अविरत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान मिळवत राहिले पाहिजे.

समाजातील चांगले लोक शोधून त्यांना सन्मानित करण्याचे काम चोरडिया दाम्पत्य निर्मळ मनाने करत आहे.” सचिन पिळगावकर म्हणाले, “जीवनात ईश्वराचा आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद भरभरून मिळाला.

प्रेक्षकांना सतत काहीतरी नाविन्यपूर्ण, मनोरंजन करणारे देण्याच्या भावनेतून काम करत आलो. नव्या दमाच्या निर्मात्यांना सहकार्य करण्याची भावना माझी आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ असते.

आपल्या मातेचे, पत्नीचे, मुलीचे खूप योगदान असते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्समधून आदर्श पिढी घडवण्याचे काम होते आहे. हा पुरस्कार भारतीय सेनेला समर्पित करतो.”
राहुल कपूर जैन यांनी प्रेरक भाषणाने उपस्थितांना प्रभावित केले.

विद्यार्थ्यांसमवेत, तरुणासोबत काम करताना मलाही खूप ऊर्जा मिळते, असे त्यांनी नमूद केले. इंद्रनील चितळे यांनी टीमवर्क, आव्हानात्मक भूमिका निभावण्याची तयारी गरजेची असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तींना गेली तेवीस वर्षे सूर्यदत्त जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सर्वांसाठी सर्वांगीण विकासाचे शिक्षण हे ध्येय घेऊन सूर्यदत्त गेली २७ वर्षे वाटचाल करत आहे. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यात येते. सीए अशोक कुमार पगारिया, राजेंद्र मुथा यांनीही मनोगते व्यक्त केले.

सर्व मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा गौरव केला व सूर्यदत्त संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. श्वेता राठोड-कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.

Feb 2025 1

Latest Articles

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

सहकारी अधिकारी, उपनिबंधक लाच घेताना जेरबंद

June 28, 2025
शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

June 28, 2025

Maharashtra News Netwrok

June 28, 2025
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
Load More
Previous Post

भूम तालुक्याची क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

Next Post

स्मरण आक्काचं व्याख्यानमाला २०२५ – पहिले पुष्प गुंफताना प्रा. यशवंत गोसावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

सहकारी अधिकारी, उपनिबंधक लाच घेताना जेरबंद

June 28, 2025
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

June 28, 2025
विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

सहकारी अधिकारी, उपनिबंधक लाच घेताना जेरबंद

June 28, 2025
शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

June 28, 2025

Maharashtra News Netwrok

June 28, 2025
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

सहकारी अधिकारी, उपनिबंधक लाच घेताना जेरबंद

June 28, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta