आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ 09 मार्चला रक्तदान शिबिर

Spread the love

पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने 09 मार्च 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आदिनाथ जैन स्थानक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर यंदाचे सहावे वर्ष असून, 1,000 बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये गौतम निधी फौंडेशन पुणे, जितो युथ विंग पुणे, युगल घर्म संघ पुणे, डिवाइन जैन ग्रुप, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप्स पुणे परिवार, आनंद दर्शन युवा मंच, आनंद दरबार, फर्स्ट विजन प्री-स्कूल, आरंभ यात्रा संघ, राजश्री शाहू बँक, सह्याद्री पतसंस्था, फ्रेंड्स क्लब फॉर एव्हर, सहाय्यता ग्रुप, गुड टाईम ग्रुप, ISO CIL क्लब, दी सोशल युथ क्लब, FTN फाउंडेशन, आर. जी. हेल्पिंग हँड्स, कुमुद ग्रुप, NVCL ग्रुप, The Wholesome Bowl, Love Care Share Foundation, एलेमेंट्स ग्रुप, सिद्धार्थ हॉस्पिटल अशा अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी होत आहेत.

या शिबिरासाठी डॉ. विजय सेटीया यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, सुमारे 6 ब्लड बँका रक्त संकलित करणार आहेत. तसेच, गौतम नाबरिया यांच्या सोबत दुगड परिवारातील सर्व सदस्य तसेच श्वेता व संग्राम होनराव यांचे देखील रक्तदान शिबिरात महत्त्वाचे योगदान आहे.

या रक्तदान शिबिरात सहभागी सर्व संस्थांनी आपल्या सदस्यांना सोबत आणावे आणि अधिकाधिक रक्तदानासाठी प्रेरित करावे, असे आव्हान अॅड. रविंद्र दुगड यांनी महाराष्ट्र जैन वार्ताशी बोलताना केले.