आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘जैन हिल’ ला आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांची प्रेरणादायी भेट

Spread the love

जळगाव : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेतृत्वाखाली जगविख्यात ‘जैन हिल’ येथील विविध प्रकल्प आणि ‘गांधी तीर्थ’ ला भेट देत संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.

या दौऱ्यात जैन हिलमधील विविध मूल्यवर्धित प्रकल्पांसह जलसंधारण, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रम, सोलार प्रकल्प, ठिबक सिंचन योजना आणि टिश्यू कल्चर प्रकल्पांना भेट देण्यात आली.

प्रशासकीय अधिकारी गिरीश कुलकर्णी यांनी या प्रकल्पांचा पूर्वेतिहास आणि महत्त्व विस्तृत स्वरूपात मांडले. संस्थेच्या वतीने संचालक अभय जैन यांनी श्री संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

या दौऱ्यात जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. श्रद्धेय स्व. भवरलालजी जैन यांना श्रद्धांजली अर्पण करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे दूरदृष्टीचे कार्य आणि सामाजिक योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या दौऱ्यात संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी, उपाध्यक्ष विजय गांधी, माजी अध्यक्ष जवाहर मुथा, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री राजेंद्र छाजेड, विश्वस्त सूर्यकांत मुथीयान आणि मोतीलाल चोरडिया यांनी सहभाग घेतला.‘जैन हिल’ ही केवळ औद्योगिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचीही एक महत्वपूर्ण चळवळ आहे, असे मत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.