आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जैन धर्माचार्य श्री देवनंदी महाराजांचे पुण्यात जल्लोषात स्वागत

Spread the love

पुणे : णमोकार तीर्थ प्रणेता सारस्वताचार्य श्री देवनंदी महाराज यांचे पुणे महानगरात आगमन झाल्यानंतर हडपसर परिसरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गंजपेठ येथील दिगंबर जैन मंदिर, पारसभवन व जैनोदय या तीनही जीर्णोद्धारित मंदिरांमध्ये स्थापन होणाऱ्या मूर्तींच्या पंचकल्याणक महामहोत्सवासाठी श्री देवनंदी महाराज पुण्यात आले आहेत. जवळपास १६०० किमीचा पदयात्रेचा प्रवास करून पाच मुनी संघ पुण्यात दाखल झाले आहेत.

हा पंचकल्याणक महामहोत्सव दि. ०५ मार्च २०२५ ते ०९ मार्च २०२५ या कालावधीत नाजुश्री जय जिनेंद्र प्रतिष्ठान, गंगाधाम, गुलटेकडी येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

या धार्मिक सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाल ब्रह्मचारी प्रतिष्ठाचार्य अक्षय भैय्या (राजस्थान) यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडणार आहे.
या महामहोत्सवात जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थित राहून धर्मप्रभावना वृद्धिंगत करावी, असे आवाहन संयोजक मनीष जैन, विनय चुडिवाल आणि शीतल लोहाडे यांनी केले आहे.