चिंचवड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह, चिंचवड (पुणे) येथे माजी विद्यार्थ्यांसाठी भव्य स्नेहमिलन (Get Together) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार असून, १९७१ ते २०२५ या कालावधीत वसतिगृहात राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
अनेक वर्षांनी जुन्या मित्रांना भेटण्याची संधी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मिळणार असून, विद्यार्थ्यांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. या विशेष कार्यक्रमासाठी निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही.
परंतु, उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या कार्यक्रमात प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांचे मार्गदर्शन लाभणार असून, माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण, संवाद, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनौपचारिक गप्पा, तसेच भोजन आणि निवास व्यवस्थेची खास सोय करण्यात आली आहे.
संपर्कासाठी – महावीर जैन: ९८२२५३२५१६, गृहपती: ७६२०६११५८०. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उपस्थितीची नोंदणी लवकरात लवकर करावी. हा कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
