ओजस्वी, तेजस्वी युवा पिढी घडविणाऱ्या सूर्यदत्तच्या कार्याची दखल : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांना ‘सकाळ महाब्रँड्स’ सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण, उद्योग, बांधकाम आणि विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या गौरवासाठी आयोजित या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सूर्यदत्त संस्थेला सन्मान प्रदान करण्यात आला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ महाब्रँड्स’ पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला हा सन्मान देण्यात आला कारण त्यांनी मूल्याधारित, रोजगारक्षम आणि सर्वांगीण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी विकास साधला आहे.
संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणात जागतिक दृष्टिकोन, तज्ज्ञांची कोअर टीम आणि सल्लागार मंडळ, भारतात व भारताबाहेर अभ्यासदौरे, NAAC मान्यताप्राप्त दर्जा, आणि उद्योगांच्या गरजेनुसार डिझाइन केलेले अभ्यासक्रम.
राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि स्टार्टअप संस्कृतीचा विकास हेदेखील संस्थेच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. विविध शैक्षणिक रँकिंगमध्ये सूर्यदत्त समूह सातत्याने अग्रस्थानी आहे. त्यामुळेच ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ म्हणून संस्थेला गौरविण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून विविध क्षेत्रातील विस्तारासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व विजेत्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले की, “सूर्यदत्तच्या माध्यमातून शिक्षणाला नवीन तंत्रज्ञान आणि मूल्यांची जोड दिली आहे. आमचे ध्येय आहे की सर्वांना दर्जेदार आणि जीवनकौशल्याधारित शिक्षण मिळावे. गेली २७ वर्षे आम्ही याच दिशेने कार्य करत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “संस्थेमध्ये केजी ते रिसर्चपर्यंत शिक्षण उपलब्ध असून नवीन शैक्षणिक वर्षात बावधन कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.” सूर्यदत्त संस्थेने आतापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
यामध्ये योगवारी यात्रा, आरोग्याथॉन, २४ तासांचा सायलेंट रीडेथॉन, ब्लाइंडफोल्ड अॅक्टिव्हिटीज, २५ तासांची देशभक्तिपर काव्यथॉन, ११०० तुळशी रोपांद्वारे भारताचा नकाशा, ७००० किलो पुणेरी मिसळचे गरजूंना वितरण, कलाआरोग्यम् व तालआरोग्यम् योगथॉन, ‘नवरात्र: भारताचे रंग’ सारखे जागतिक विक्रम समाविष्ट आहेत.
जागतिक योगदिनानिमित्त आयोजित ‘सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटिव्ह योगथॉन २०२३’ मध्ये सलग ६ तास योग साधना करत एक आणि २ तासांहून अधिक वेळ सिद्धासन करत दुसरा जागतिक विक्रमही नोंदवण्यात आला आहे.
ई-कचऱ्याचा पर्यावरणपूरक वापर करत संस्थेच्या कॅम्पसमध्ये ई-कचऱ्यापासून ‘ई-चित्ता’ साकारण्यात आला आहे. यासोबतच मंगळयान, फ्लायिंग हॉर्स, शार्क, आणि हॉर्स विथ कॅरिएट यांसारख्या कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत.
संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्य मोफत वितरण यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, H2E पॉवर सिस्टिमचे संस्थापक आणि CEO सिद्धार्थ मयूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि व्यवस्थापनाचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
