नवीन कार्यकारणी ने स्वीकारला पदभार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनचे चेअरमन, पदाधिकारी तसेच पुणे झोनच्या समन्वय समितीचा पदग्रहण समारंभ जय जिनेन्द्र प्रतिष्ठान, पुणे येथे उत्साहात पार पडला.
बिरेन शहा (अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय फेडरेशन) यांच्या हस्ते दिलीप मेहता (चेअरमन, महाराष्ट्र रिजन), सचिन शहा, मालेगाव (सचिव, महाराष्ट्र रिजन) व कार्यकारी मंडळ, तसेच पुणे झोनचे समन्वयक सुजस शहा, सचिव कल्पक शहा आणि त्यांच्या समितीचे २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी पदग्रहण झाले.
महाराष्ट्र रिजनमधील पाच झोनमधील सुजस शहा (पुणे झोन), रज्जुबेन कटारिया (कोल्हापूर झोन), गौतम छाजेड (सोलापूर झोन), डॉ. पमिता सुराणा (नाशिक झोन) आणि सचिन कापडिया (छ. संभाजीनगर, मालेगाव झोन) यांनी समन्वयक पदाचा कार्यभार स्वीकारला.
संस्थेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून देशात व परदेशात ४७५ ग्रुप्स आणि १ लाख कुटुंब सदस्य आहेत. महाराष्ट्र रिजनमध्ये मुख्य ग्रुप, संगिनी व युवा फोरम मिळून ९० ग्रुप्स व १५,००० सदस्य आहेत.
गोग्रास योजना, एज्युकाॅन, जीवदया, रक्तदान, साधर्मिक सेवा अशा विविध कमिट्यांद्वारे संस्थेचे सामाजिक कार्य प्रभावीपणे सुरू आहे. पदग्रहण समारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
ललित गांधी, राजेश शहा, अचल जैन, प्रवीण चोरबेले, मिलिंद फडे, सचिन जैन, तसेच फेडरेशनचे पदाधिकारी ललित शहा, मनीष शहा, अभय नहार, मनीष कोठारी, चिराग चोक्सी, मनीष दोषी, जयेश शहा, विनोद शहा, संदीप शहा, मनेष शहा, राजेंद्र धोका, कल्पेश देसाई, ऊन्मेश कर्नावट, सचिन शहा, हसमुख जैन, लालचंद जैन, महावीर पारेख यांच्यासह देशभरातील जैन सोशल ग्रुपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन दिलीप चोरबेले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रितम जैन यांनी केले.
