बालाजी माळी हे प्रदेश कार्याध्यक्षपदी, अमोल कवळस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम: माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये भुम येथील प्रसिद्ध समाजसेवक बालाजी माळी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी आणि अमोल अनंत कवळस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व सदस्यांना संघाचे विश्वस्त संतोष बोराटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी ३१ प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक दत्ताभाऊ माळी, नुकतीच नियुक्ती झालेले प्रदेश प्रवक्ते ज्ञानेश्वर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. वनिता गारुडकर, प्रदेश उपाध्यक्ष रूपेश नेरकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेश गोरे, प्रदेशाध्यक्ष (सेवानिवृत्त) संजय दरवडे, सतीश खुणे, सुधीर ढगे, प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननावरे, सचिव सचिन राऊत यांसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.
या कार्यकारिणीच्या जाहीरतेनंतर संघाच्या कार्याची गती आणि विकासाची दिशा निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण टाकलेली आहे.
