आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

Spread the love

पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली.

खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ साली झाली असून, १९८३ साली तत्कालीन संस्था अध्यक्ष अॅड. एस. के. जैन व चिटणीस स्व. अॅड. चंद्रकांत छाजेड यांच्या प्रयत्नातून टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने माणिक महोत्सवही साजरा केला असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाखांचा आणि वरिष्ठ महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे.

महाविद्यालयाला स्वायत्तता प्राप्त झाल्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बीएससी डेटा सायन्स, बीएससी इंटेरिअर डिझाईन, बीएससी सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक, बीएससी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी अॅनिमेशन, बीए इन सिव्हिल सर्व्हिसेस आणि बीए इन नाट्यशास्त्र हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

यावेळी सचिव आनंद छाजेड, उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, डॉ. सुचेता दळवी, प्रा. राजेंद्र लेले, प्रा. जुगल नाईक, डॉ. काळे निलेश, डॉ. अविनाश कोल्हे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. डी. एम. मुपडे, डॉ. नागेंद्र जंगम, डॉ. प्रकाश पांढरपिसे, डॉ. महेश बेंडभर आणि कार्यालय अधीक्षक लक्ष्मण डामसे उपस्थित होते.