आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

योग दिनानिमित्त वारकऱ्यांसाठी चोरबेले परिवाराच्या वतीने विशेष योग सत्र

Spread the love

पुणे : मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध व्यापारी चैनसुखलाल माणिकचंद फर्म येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची दिंडी मुक्कामी होती. या दिंडीतील आलेल्या सर्व वारकऱ्यांची मनोभावे सेवा चोरबेले परिवाराच्या वतीने करण्यात आली.

आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या कन्या प्रांजल चोरबेले यांनी सर्व वारकऱ्यांसाठी एक तासाचे विशेष योग सत्र आयोजित केले होते. यामध्ये सुमारे ६०० हून अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेत योगासनांचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला नगरसेवक प्रवीण चोरबेले, संजय चोरबेले, दिलीप चोरबेले, अनिल भन्साळी, मनीषा चोरबेले, पियुष चोरबेले, अॅड. नितीश चोरबेले, आदेश चोरबेले, आयुष चोरबेले आणि चोरबेले परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.