‘आई प्रतिष्ठान’, वाघोलीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रौप्य महोत्सवी उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ‘आई प्रतिष्ठान’ गेली २५ वर्षे अखंडपणे चहा, बिस्किटे, बटर आणि पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करते. यंदाही मंगळवारी बेलसर फाटा येथे तब्बल एक लाख कप चहा वारकऱ्यांना वितरित करण्यात आला.
वर्ष २००० मध्ये मनोज कांकरिया, चंद्रशेखर लुंकड, अमित वाघोलीकर, सचिन जैन, संदीप भोर, शैलेश कान्नव, पीरचंद वर्मा, राजू गवंडर आणि डॉ. किशोर देसरडा यांनी काहीशा अल्प प्रमाणात सुरू केलेल्या या उपक्रमाची व्याप्ती दरवर्षी वाढत गेली. आज रौप्य महोत्सवी वर्षात हा आकडा एक लाख कपांपर्यंत पोहोचला आहे.
सकाळी ६ ते सायंकाळी ६ — सलग १२ तास चहा वाटपाचे काम सुरु असते. प्रतिष्ठानचे सदस्य स्वतः चहा बनवतात; सुमारे १०० स्वयंसेवक यासाठी राबतात. हा उपक्रम पाहून ‘वारघडे प्रतिष्ठान’चे चंद्रकांत वारघडे यांनीही मागील पाच वर्षापासून बिया व वृक्षांचे वाटप सुरू केले आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाला चालना मिळावी.
यंदा आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र उमाप आणि निलेश कबीर महाराज यांनी बेलसर फाटा येथील छावणीला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव, माजी उपसरपंच शांताराम कटके, सुजाता सातव, योगिता सातव, चंद्रकांत वारघडे, कमल कांकरिया, आनंदीबाई पगारिया, सुनील बाफना, अण्णा काळे, दीपक कर्नावट, महेश पगारिया, अमित नहार, आदेश सोळंकी, सुनील दुगड, प्रियाली कांकरिया, कांचन चोरडिया, स्मिता लुंकड, नाशिकच्या ‘मेरी जॉगर्स’ गटाचे सदस्य व के जे सोमय्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
रोजच्या व्यवस्थेत राजू ढमढेरे, बाळू कदम, नीलेश वानगोटा, हरीश कुलकर्णी, राहुल निमकर्डे, विजेंद्र गंधारे आणि संतोष बनकर यांचे मोलाचे योगदान लाभले.
रौप्य महोत्सवानिमित्त यावर्षी प्रथमच ‘वारी भक्ती पहाट’चे आयोजन करण्यात आले. सुवर्णा कान्नव यांच्या ‘स्वर साधना ग्रुप’ने सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित भाविकांना अधिकच भावमय वातावरणात ठेवले.
