सायबर चोरट्यांचा नवा फंडा, सेवानिवृत्त कर्नलची केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण वेदप्रकाश सुद (वय ५६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, १७ जून ते ९ जुलै २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत एका ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक लोहगाव भागात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. विमा पॉलिसीची १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यासाठी सायबर चोरट्यांनी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. विम्याची रक्कम अधिक असल्याचे सांगून त्यांनी या ज्येष्ठ नागरिकाला मोहात पाडले व वेगवेगळ्या कारणांमुळे वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगितले.
त्यानुसार, तक्रारदारांनी गेल्या वर्षभरात चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एकूण ३२ लाख ७५ हजार रुपये जमा केले. विमा पॉलिसीची रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
