श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, भूममध्ये दोघांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, तालुका भुमच्या चेअरमनपदी पाथरुड येथील विजय काका बोराडे यांची तर उपचेअरमनपदी रामेश्वर येथील श्रीराम खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सदर संघाची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली असून, संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा मा. राहुल मोटे यांच्या गटाकडे परतले आहे. आज पार पडलेल्या चेअरमन आणि उपचेअरमन पदांच्या निवडणुकीतही एकमताने ही निवड झाली.
विजय काका बोराडे व श्रीराम खंडागळे यांची निवड झाल्यानंतर तालुक्यातील विविध भागांतून त्यांचे अभिनंदन केले जात असून, संघाच्या पुढील कार्यकाळाकडून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा व निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
