शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून घ्यावेत : मा. आ. राहुल मोटे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : पारगाव (मोटे) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. आज महसूल अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या पिकांचे स्पॉट पंचनामे करण्यात आले. ज्यांनी अद्याप पंचनामे केलेले नाहीत त्यांनी तातडीने करून घ्यावेत, असे आवाहन मा. आ. राहुल मोटे यांनी केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी मा. आ. राहुल मोटे शासन स्तरावर प्रयत्नशील आहेत. तरीही प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःहून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले.
सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत असून, पंचनामे करताना काही अडचण आल्यास प्रदीप मोटे, यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. आज दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन स्पॉट पंचनामे केले.
यामध्ये तलाठी किशोर उंदरे, कृषी सहाय्यक काकडे, मंडळ अधिकारी पवार, कृषी अधिकारी जाधव, अफसर शेख, कृष्णा मोटे यांच्यासह सारंग मोटे, पत्रकार राहुल डोके, अमोल मोटे, गणेश डोके, विशाल आखाडे, डॉ. गणेश मोटे, गणेश आखाडे, अमर मोटे, महेश आखाडे उपस्थित होते.
