शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी : शेतकरी नुकसानभरपाईसाठी आग्रही
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तेरखेडा : तेरखेडा मंडळातील कडकनाथ वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे सुरू झाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत.
या कामासाठी कृषी सहाय्यक अमोल मुळे, तलाठी सुप्रिया भोसले तसेच ग्रामसेवक महादेव सुद्रिक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष फिरून शेतातील पाहणी केली. तहसीलदार वाशी, तालुका कृषी अधिकारी वाशी आणि गटविकास अधिकारी वाशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पंचनामे पार पाडले जात आहेत. त्यांच्या मेहनतीचे परिसरातील शेतकरी कौतुक करीत आहेत.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी शासनाकडून सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आग्रही असून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
