महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी शहरातील सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. राजकुमार एकनाथ कुलकर्णी यांनी युजीसीमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
सुलाखे विद्यालयातील प्राध्यापक म्हणून कुलकर्णी सर हे अभ्यासू, विद्यार्थीप्रिय व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षणशास्त्रातील गाढा व्यासंग, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पन्नाशीनंतर हे यश संपादन केले ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
त्यांनी M.Sc., B.Ed., M.A., M.Ed., DCM, DSM, D.J. अशा विविध पदवी व पदव्युत्तर पदव्या प्राप्त करून आपले शैक्षणिक कर्तृत्व सिद्ध केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सरांचे मित्रपरिवार, सुलाखे विद्यालयातील सहकारी शिक्षकवर्ग, शिक्षणतज्ज्ञ तसेच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
