सेवा, शिक्षा व विकासाचे ध्येय घेऊन दोन दिवसीय संमेलनाचा भव्य उत्सव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे प.पू. प्रवीण ऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने चौथे अखिल राष्ट्रीय नहार बंधू संमेलन भव्यदिव्य उत्साहात पार पडले. श्री अखिल भारतीय नहार बंधू जैन महासंघाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनाला देशभरातील नहार कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सेवा, शिक्षा आणि विकासाचे विचार पुढे नेण्यासाठी श्री अखिल भारतीय नहार बंधू जैन महासंघाच्या वतीने या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतून नहार कुटुंबीय या संमेलनात सहभागी झाले.
संमेलनात सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर घेण्यात आले. पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती सुनील नहार, सचिन नहार, अनिल नहार यांच्या वतीने गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप उत्साहवर्धक वातावरणात झाला.
या प्रसंगी राजेश नहार, कार्याध्यक्ष तोलाचंद नहार, खजिनदार सुभाष नहार, उपाध्यक्ष प्रदीप नहार, श्रेणिक नहार (चेन्नई), सुभाष नहार (औरंगाबाद), किशन नहार (दिल्ली), अजय नहार (चेन्नई), आनंद नहार, आर.आर. नहार, रसिकलाल नहार, अभय नहार, अनुज नहार तसेच पाचही झोनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर उपस्थित सर्व नहार कुटुंबीयांचे आभार गौरव नहार यांनी मानले.















