महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त (अतिक्रमण) संदीप खलाटे आणि उपायुक्त (परिमंडळ – ४) प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील उंड्री चौक, साईनगर आणि कपिलनगर परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत रस्ते व फूटपाथवरील फ्रंट आणि साईड मार्जिनसह सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे व शेड हटविण्यात आली. ही कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या देखरेखीखाली बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने केली.
कारवाईदरम्यान उपअभियंता संदीप शिंदे, कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवार, किरण अहिरराव, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, प्र. अतिक्रमण निरीक्षक किरण डवरी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संतोष मेथे, सचिन जाधव, प्रतीक सानप, रणजित जाधव, माधव बहिरम, किरण शिंदे तसेच हडपसर व वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण पथके सहभागी झाली होती.
या कारवाईत तब्बल १९,७०० चौ. फु. अनधिकृत कच्चे-पक्के शेड व बांधकाम हटविण्यात आले. तसेच जप्त करण्यात आलेला माल खाडीमशीन गोडावून येथे जमा करण्यात आला. जप्त मालामध्ये काऊंटर : ३, शेड : १९, इतर साहित्य : ३, पथारी : ५, हातगाड्या : ८, कच्चे / पक्के बांधकाम : १९,७०० चौ. फु. या कारवाईसाठी पुणे महानगरपालिका, पोलिस बंदोबस्त तसेच एम.एस.एफ. जवानांची मदत घेण्यात आली.















