महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: मुकुंदनगर कॉलनीतील राजलक्ष्मी सोसायटीत फ्लॅटधारकांसाठी एक महत्वाचा सामूहिक सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक फ्लॅटधारकासाठी स्वतंत्र विद्युत निर्मिती करणारे PV सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे घरगुती वीज बिलात मोठी बचत होईल.
सोसायटीच्या टेरेसवर एलिवेटेड स्ट्रक्चर तयार करून प्रत्येक 20 फ्लॅटधारकांसाठी सोलर पॅनेल बसविण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. सोलर स्ट्रक्चर आणि इतर कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरचा संपूर्ण खर्च सोसायटीच्या कॉमन फंडातून केला गेला, त्यामुळे सदस्यांना फक्त स्वतःच्या सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टरचा खर्च करावा लागला. यामुळे प्रत्येक सदस्यासाठी खर्च फारच कमी झाला.
विशेष म्हणजे, दिवाळीच्या आगोदरच प्रत्येक सदस्याच्या अकाउंटमध्ये KW क्षमतेनुसार सुमारे 78,000 रुपये सरकारी सबसिडी जमा झाली, ज्यामुळे प्रकल्पाचा फायदा लगेच दिसून आला.
हा संपूर्ण प्रकल्प अक्षत सोलरचे संस्थापक संदीप संकलेचा आणि त्यांच्या टीमने अल्पावधीत यशस्वीरित्या पूर्ण केला. सोसायटीतील सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा प्रकारचे सामूहिक सौरऊर्जा प्रकल्प भविष्यातील शहरातील इतर सोसायटीसाठीही प्रेरणादायक ठरण्याची शक्यता आहे.



















