महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना आणून महिलांना स्वावलंबी करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे यांनी दिली.
भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्यावतीने भूम शहरातील महिलांची संवाद बैठक साहिल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. या बैठकीला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या संवाद बैठकीमध्ये संयोगिता गाढवे बोलताना म्हणाल्या की, मागील २३ वर्षाच्या कार्यकाळामध्ये माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली भूम शहरांमध्ये विविध प्रकारची विकास कामे करण्यात आली आहेत. तसेच महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध कामे करण्यात आली आहेत.
तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी असेल तर निश्चितपणाने आम्ही भूमकरांसाठी जे जे करणे शक्य होईल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, असे सांगितले. यावेळी शहरातील महिलांनी गाढवे दाम्पत्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचत कौतुक केलं.
त्याचबरोबर अद्याप काय करायला हवे आहे, याचे देखील संवाद, मनोगत व्यक्त केला. शहरात झालेल्या विविध विकास कामाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

















