• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
0
01 02 25 5
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

ठाणे, छत्रपती संभाजीनगरमधून पैसे स्वीकारणाऱ्या ८ जणांना केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांपैकी पैसे स्वीकारणाऱ्या ८ जणांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली आहे.

मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर), साहिल जॉन श्रीसुंदर (वय २२, रा. भीमनगर, संभाजीनगर), विश्वजीत जनार्दन खंदारे (वय २१, रा. भीमनगर, संभाजीनगर), अभिजित शशिल नाडे (वय २१, रा. संभाजीनगर), दिशांत राजेंद्र कांबळे (वय २२, रा. भीमनगर, संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी फिर्याद दिली होती. हे ज्येष्ठ नागरिक मूळचे हरियाणा येथील आहेत. पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना रक्कम मिळाली होती.

ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या ७ बँक खात्यांमध्ये वेळोवेळी २२ कोटी ३ लाख रुपये जमा केले. मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.

या गुन्ह्याचा तपास केला असता मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून दिसून आले की, फिर्यादी यांची फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी मोठ्या प्रमाणातील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. ही रक्कम २७ वेगवेगळ्या लोकांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. त्यातून पोलिसांनी प्रथम चौघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून साहिल जॉन श्रीसुंदर व इतरांची लिंक लागली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशील डमरे, पोलीस हवालदार रामाणे, हंबीर, मदने, चौकटे, मांढरे, मुंढे, कोंडे, कारकुड, गंगाधर काळे, पोलीस अंमलदार भिंगारे, होळकर, सचिन शिंदे, विजय भोसले, अमदनान शेख यांनी केली.

३ कोटी २४ लाखांची रक्कम गोठविली – या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांच्या फसवणुकीच्या रक्कमेपैकी ३ कोटी २४ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सर्व आरोपी आपल्या खात्यांमध्ये फसवणुकीचे पैसे स्वीकारत होते. लाला उमाप व परमेश्वर दाभाडे यांच्या बँक खात्यांचे किट साहिल श्रीसुंदर याच्याकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या पुराव्यानुसार त्याच्या नेटवर्कमधील विश्वजीत खंदारे याला ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र जनधन योजना अंतर्गत बँक खात्यांचे किट असलेल्या अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले. आकाश मराठे हा बी.कॉम. पदवीधर असून बेरोजगार आहे. मुनीलकुमार सिंह नंदिनी युटिलिटी सर्व्हिसेस ही सिक्युरिटी एजन्सी चालवतो. अभिजित नाडे याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो नर्सिंग कोर्स शिकत आहे. लाला उमाप व परमेश्वर दाभाडे हे बिगारी काम करतात. साहिल श्रीसुंदर भाजी विक्री करतो. दिशांत कांबळे हा बीसीएस पदवीधर असून कुरिअर कंपनीत काम करतो.

Feb 202622 1

Latest Articles

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026

दहशत पसरवणाऱ्या चौघे गुन्हेगारांची सिंहगड रोड पोलिसांनी काढली वरात

February 14, 2026

पानी कब और कैसे पीए

February 14, 2026
Load More
Previous Post

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

Next Post

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026
पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

February 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026

दहशत पसरवणाऱ्या चौघे गुन्हेगारांची सिंहगड रोड पोलिसांनी काढली वरात

February 14, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta