निर्मला छाजेड, जैनम जैन आणि जीविका जैन यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित महर्षी आनंद सेवा पुरस्कार वितरण समारंभ दापोडी येथील जैन स्थानकामध्ये उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे प्रणेते प. पू. प्रशांतऋषीजी म.सा., प. पू. विजयस्मिता जी म.सा. आणि प. पू. करुणाश्रीजी म.सा. यांचे मंगलमय सान्निध्य लाभले.
या कार्यक्रमात निर्मला चंद्रकांतजी छाजेड, जैनम धीरज जैन आणि जीविका धीरज जैन यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महर्षी आनंद सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, जैन मफलर आणि हार हे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक करताना पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय करून दिला. निर्मलाताई छाजेड या मानव मिलन संस्था आणि वर्धमान रिसर्च सेंटरमार्फत सामाजिक-शैक्षणिक कार्य करतात.
तेरा वर्षांचा जैनम जैन युवक आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने देशभर युवकांना मार्गदर्शन करतो, तर दहा वर्षांची जीविका जैन हिने जैनॉलॉजी, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा संगम या विषयावर अनेक ठिकाणी प्रबोधन केले आहे.
समारंभाला जवाहर बोथरा, किशोर भंडारी, विलास पगारिया, सागर सांकला, रवींद्र बलाई, संदेश गदिया, लता पगारिया, कविता शेट्टी, नितल फुलफगर, श्रेयस पगारिया, सूर्यकांत मुथियान, मोतीलाल चोरडिया, पंकज कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोककुमार पगारिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष संदीप फुलफगर यांनी केले. या वेळी दापोडी संघाचे सतीश लुंकड, सुनील कोठारी, पारस लुंकड, स्वाती लुंकड, निता बाफना, विलास मुथा तसेच भोसरी संघाचे राजेंद्र बाठिया, राजेंद्र चोरडिया आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.















