महाराष्ट्रात तापमानात मोठी घट : जेऊर ७°, पुणे ९.४°
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा दबाव वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य भारतात गारठा जाणवत आहे.
राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून मंगळवारी सकाळी जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात ९.४ अंश, तर हवेली (कदम वाक वस्ती) येथे तब्बल ६.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील थंड वार्यांचा जोर वाढत असून त्याचा थेट परिणाम राज्याच्या किमान तापमानावर झाला आहे. मंगळवारी तापमानात आणखी घसरण झाली आणि अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवली.

















