सहा वर्षांच्या वयात ५३ तास स्केटिंगची अविश्वसनीय कामगिरी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कात्रज गावातील रहिवासी मनस्वी उमेश ठोंबरे हिने दिनांक २४ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कर्नाटकातील बेळगाव येथे शिवगंगा स्केटिंग रिंगवर आयोजित स्केटिंग स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
मनस्वीने वयाच्या केवळ सहाव्या वर्षी तब्बल ५३ तास अखंड स्केटिंग करत १०० मीटर रोलर स्केटिंग शर्यत पूर्ण केली आणि नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिचा हा पराक्रम केवळ राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.
या विक्रमामागे तिच्या प्रशिक्षक विजय मलजी सर यांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले. अत्यंत कमी वयात मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मनस्वी सरहद ग्लोबल स्कूल, गुजर निंबाळकरवाडी येथे शिक्षण घेत आहे. तिच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल तिला मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा!
















