महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : मा. नगराध्यक्ष तथा विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते परांडा येथे पार पडलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुम येथील पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
८० किलो वजनी गटातून अस्लम जमादार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ६५ किलो वजनी गटातून रोहित माने याने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही कुस्तीपटूंनी १९ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून ते स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशाबद्दल दोन्ही पैलवानांचा यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मौलाली तालीमचे वस्ताद मामू जमादार, पै. धनंजय गाढवे यांच्यासह सर्व पैलवान मंडळी उपस्थित होती.
















