सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच काही पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे समादेशक चिलुमुला रजनीकांत यांची परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलीस मुख्यालयातून परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची परिमंडळ ५ येथून परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. परिमंडळ ४ चे सोमय मुंडे यांची परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
पुण्यात नव्याने आलेले सागर कवडे यांची पोलीस उपायुक्त (मुख्यालय) येथे नियुक्ती देण्यात आली आहे. याचबरोबर परिमंडळ ६ व ७ साठी प्रत्येकी २ सहायक पोलीस आयुक्त पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवीन ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आल्याने काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस अंमलदार यांची नवीन ५ पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त (सध्याचे ठिकाण) बदलीचे ठिकाण :-
अतुलकुमार नवगिरे (विशेष शाखा १) – हडपसर विभाग.
नुतन पवार (विशेष शाखा २) – लोणीकंद विभाग.
प्रांजली सोनावणे (येरवडा विभाग) – खराडी विभाग.
राहुल आवारे (स्वारगेट विभाग) – भारती विद्यापीठ विभाग.
सुनिल जैतापूरकर (अभियान) – येरवडा विभाग.
धन्यकुमार गोडसे (आस्थापना) – स्वारगेट विभाग.
अनुराधा उदमले (हडपसर विभाग) – लोणी काळभोर विभाग.
शैलेश संखे (पदोन्नती) – गुन्हे शाखा, सहायक पोलीस आयुक्त.
पोलीस निरीक्षक (सध्याचे ठिकाण) नवीन पद स्थापना :-
बाबासाहेब निकम (गुन्हे, मुंढवा) – वपोनि., मांजरी पोलीस ठाणे.
अमर काळंगे (गुन्हे, काळेपडळ) – वपोनि., येवलेवाडी पोलीस ठाणे.
रवींद्र कदम (पो.नि., वाहतूक शाखा) – वपोनि., लक्ष्मीनगर पोलीस ठाणे.
विश्वजीत जगताप (गुन्हे, खराडी) – वपोनि., लोहगाव पोलीस ठाणे.
आसाराम शेटे (गुन्हे, वाघोली) – वपोनि., नर्हे पोलीस ठाणे.
विजयकुमार डोके (गुन्हे, वानवडी) – वपोनि., कोरेगाव पार्क पोलीस ठाणे.
संगिता जाधव (गुन्हे, कोरेगाव) – गुन्हे, वानवडी पोलीस ठाणे.
















