• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बार्शीत भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक उत्साहात साजरा

March 31, 2026
0
WhatsApp Image 2026 03 31 at 5.31.47 PM
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

बार्शी : ३१ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस बार्शीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जिओ और जीने दो” तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या स्मरणार्थ सकल जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने श्री वर्धमान जैन स्थानक येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली. ही सवाद्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिर येथे समाप्त झाली.

शोभायात्रेदरम्यान शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते व ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. ज्या भागांत शोभायात्रा पोहोचली नाही, तेथे युवक-युवतींनी “अहिंसा मोटरसायकल रॅली” काढून अहिंसेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. उत्सवात महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला तसेच जैन समाजातील युवक-युवतींचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता.

या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने एकूण ७८ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात युवकांसह महिला वर्गाचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. हे शिबिर श्री वर्धमान नवयुवक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

भगवान महावीर स्वामींच्या जन्मोत्सव निमित्त स्वर्गीय पन्नालालजी मोहनलालजी श्रीश्रीमाळ यांच्या वतीने समाज बांधवांना महाप्रसादाचे पारंपरिक आयोजन करण्यात आले, ज्याचा मोठ्या संख्येने जैन समाजातील नागरिकांनी लाभ घेतला.

याच महोत्सवानिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी यांच्या वतीने गरजू व गोरगरिबांना १०१ चप्पलांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजातील गरजू घटकांना दिलासा मिळाला.

तसेच जैन समाजाच्या वतीने वर्षभर “जिवदया”, “जैन झुणका भाकर केंद्र”, “श्री महावीर धर्मार्थ दवाखाना” आणि “श्री नवकार जैन सेवातीर्थ” अंतर्गत सुमारे २५० गायींचे संगोपन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी समाजाला आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाऊसाहेब आंधळकर, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, वर्षा ठोंबरे, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ऋषभ जैन श्वेतांबर मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष सुमतीलाल मुनोत, शैलेश वखारिया, श्री वर्धमान जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जयचंद सुराणा, सचिव दिनेश श्रीश्रीमाळ, पदमचंद कांकरिया, अशोक श्रीश्रीमाळ, राहुल कुंकूलोळ, श्री महावीर जैन सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, महेश बाफना, श्री वर्धमान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर (बाळासाहेब) श्रीश्रीमाळ, ऑ. सेक्रेटरी आनंद पुनमिया, धीरज कुंकलोळ, पार्श्वनाथ मंदिरचे अध्यक्ष बाहुबली नगरकर, १००८ श्री शांतीनाथ भगवान जैन मंदिरचे अध्यक्ष राजेंद्र येवनकर, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स युवा शाखेचे प्रांतीय मंत्री पवन श्रीश्रीमाळ, धन्यकुमार शहा, जवाहर माडेकर, दिलीप गांधी, राजेंद्र धारूरकर, सुजीत काळे गोरे, राहुल दोशी, यश कुंकूलोळ, कुशल शहा, प्रमोद भंडारी, सुजित गुंदेचा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

3 2

Latest Articles

केडगावात भगवान वर्धमान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

केडगावात भगवान वर्धमान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

March 31, 2026
१२६५ ट्रिपल सीट वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात

१२६५ ट्रिपल सीट वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात

March 31, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 31, 2026
जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

March 31, 2026
दत्तनगर में भगवान महावीर जन्मकल्याणक पर भव्य वरघोड़ा

दत्तनगर में भगवान महावीर जन्मकल्याणक पर भव्य वरघोड़ा

March 31, 2026
Load More
Previous Post

केडगावात भगवान वर्धमान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

Next Post

भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात भव्य शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta