महाराष्ट्र न्युज नेटवर्क
नवी दिल्ली : गुन्हे विषयक बातम्यांचे वार्तांकन करणारे पुण्यातील वरिष्ठ पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे (NJF) पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पब्बित्र मोहन सामंतराय यांनी केली.
तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले देवेंद्र जैन, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी ओळखले जातात. गुन्हे विषयक पत्रकारितेमध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. जैन यांनी मुक्त पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता सुरू केली, नंतर त्यांनी इंडिया टुडे, दूरदर्शन, यू एन आय वृत्त संस्था, दैनिक पुढारी येथे अनेक वर्ष काम केले. पुणे क्राइम पॅट्रॉल, पुणे डिफेन्स न्यूज, पी सी पी न्यूज एजन्सी येथे ते कार्यरत आहेत.
संपूर्ण देशातील जैन हे एकमेव पत्रकार आहेत ज्यांना देशाच्या पंतप्रधानाचे स्वागत, स्वतःच्या पुणे येथील घरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.जैन यांच्यासोबत छत्तीसगडचे डी एस मिश्रा आणि श्रीमती रुणा शर्मा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या अनेक मुद्द्यांवर काम करत असून केंद्र व राज्य सरकारकडून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
















