गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : देशी बनावटीचे दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एनडीए गेट नं.10 जवळील कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळ ही कारवाई केली.
अक्षय दिलीप रावडे (वय-24 रा. उत्सव बिल्डींग, किरकीटवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर व महेश निंबाळकर यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय रावडे हा कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळील रोडवर थांबला आहे.
त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती समजली. पोलिसांनी एनडीए गेट नं. 10 जवळील बस स्टॉपजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 2 देशी बनावटीच्या पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 80 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात सिंहगड व दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, संजिव कंळबे, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, सोनम नेवसे, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, राकेश टेकावडे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.














