बार्शीतील महावीर विहारमध्ये पुष्पचक्र वाहून केले अभिवादन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरीक व शहिद पोलिसांना बार्शीच्या महावीर विहार येथे लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या वतीने श्रध्दांजली वाहुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थित शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी याप्रसंगी नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेले बार्शीचे सुपुत्र सुहास झालटे यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी
मंगेश दहिहांडे आणि पोलीस निरीक्षक शेळके यांनी २६/११ रोजी शहिद झालेल्या जवानांना अभिवादन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिओ क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, सचिव आदित्य सोनिग्रा, खजिनदार अक्षित परमार, उपाध्यक्ष यश मेहता, ऋषभ गुंदेचा, मधुर कथले, यांनी परिश्रम घेतले. तसेच महावीर विहारचे चेअरमन भुषण कठारिया व निलेश परमार यांनी विशेष परिश्रम घेतले. शुभम लोळगे यांनी राष्ट्र गीताची धून वाजवल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वराज लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. पवन श्रीश्रीमाळ यांनी आभार मानले.
















