येरवडा पोलिसांत फिर्याद : लपण्यास जागा न दिल्याच्या रागातून केला राडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तू मला काल लपण्यास जागा दिली नाहीस… तुला खल्लासच करून टाकतो, असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार करीत शिवीगाळ करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवड्यातील दुर्गामाता मंदिराजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
सागर तुजारे (वय २३, रा. येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, येरवड्यातील (यशवंतनगर) दुर्गामाता मंदिराजवळ सोमवारी (दि. २८ नोव्हेंबर) आरोपीला लपण्यासाठी फिर्यादीने जागा दिली नाही. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपीने सोमवारी (दि. २९ नोव्हेंबर) रोजी घटनास्थळी जात तुला खल्लासच करून टाकतो, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार करीत हातापायाने मारहाण केली. यावेळी दोघांनी परिसरात शिवीगाळ करीत दहशत पसरविली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वारुंगुळे करीत आहेत.














