खडक पोलीस स्टेशन : 21 दिवसात कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवघ्या २१ दिवसांत रेकॉर्डवरील ०५ सराईत गुन्हेगार यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातुन तडीपार करण्यात आले आहे.
खडक पोलीस स्टेशन पुणेच्या गुन्हे रेकॉर्डवरील सराईत व अटल गुन्हेगार सलमान ऊर्फ छन बाबु भोले, रा. लोहीयानगर, वसिम उर्फ वच्छी गुलाम महंमद शेख रा. लोहीयानगर पुणे, अभिषेक ऊर्फ बाप्पा अपुर्गा कसबे रा. घोरपडे पेठ पुणे, परवेज इक्बाल पटवेकर रा. घोरपडे पेठ, पुणे,सागर सुभाष गायकवाड, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे यांच्या विरुध्द पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे मारामारी करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत निर्माण करणे, घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दुखापत पोहचवणे,जबरी चोरी करणे, चोरी करणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत.
त्यांनी खडक पोलीस स्टेशन व इतर विविध भागात आपली भयंकर दहशत निर्माण केली होती. त्यांच्या दहशतीमुळे व भिती पोटी त्यांच्या विरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्यांच्या अशा कृत्यामुळे सर्व सामान्य नागरीकांच्या मनात भिती निर्माण होवून त्यांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. म्हणुन त्यास पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन हदद् पार करण्याबाबतचे प्रस्ताव डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे शहर यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी वरील आरोपींना पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयाचे कार्यक्षेत्रातुन दोन (२) वर्षाकरीता तडीपार केले आहे.
अशा प्रकारे आगामी पुणे मनपा निवडणूक या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे पोलीस सह आयुक्त, राजेंद्र डहाळे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग पुणे, डॉ. प्रियंका नारनवरे पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – १ व सतिश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक (गुन्हे). शंकर कुंभारे, राहुल खंडाळे, पोलीस उप-निरिक्षक व पोलीस अंमलदार नितिन जाधव, महेश पवार, किरण शितोळे यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेवुन प्रस्ताव तयार केलेले आहेत.