• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
0
18 12 25 2 1
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दीड वर्षांनी हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के नफा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तब्बल १२ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी हडपसर परिसरात राहणाऱ्या ५४ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली होती. सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही दीर्घकाळ कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर जवळपास दीड वर्षांनंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना ‘योगटाक्स’ या टेलिग्राम आयडीवरून मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये बिटकॉईन खरेदी केल्यास ४० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले होते.

फिर्यादी यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविल्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली आणि त्यावर त्यांचा यूजर आयडी तयार करण्यात आला. त्यानंतर quickcoin.top/trade ही वेबसाईट उघडल्यावर बिटकॉईन ट्रेडिंगचे पेज दिसत होते.

सायबर चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना एक टास्क दिला. त्यात ३ बिटकॉईन पर्याय निवडण्यास सांगितले आणि त्यासाठी ३ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर बिटकॉईन खरेदी करण्यास सांगण्यात आले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ८ हजार ३२७ रुपये जमा झाले. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला.

यानंतर त्यांनी त्या वेबसाईटवरून सांगितल्याप्रमाणे १० वेळा व्यवहार करत एकूण १२ लाख ११ हजार रुपये गुंतविले. वेबसाईटवर त्यांना १६ लाख ४५ हजार रुपयांचा नफा दाखविण्यात येत होता.
फिर्यादी यांनी पैसे काढण्यासाठी (विड्रॉल) विनंती केली असता, त्यांना टीडीएस भरावा लागेल, असे सांगण्यात आले.

त्यांनी ती रक्कम त्यांच्या नफ्यातून कापून घेण्यास सांगितले; मात्र आधी पैसे भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असे सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर दीड वर्षांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत.

March 202622

Latest Articles

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
Load More
Previous Post

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

Next Post

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta