महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खेल प्राधिकरण नवी दिल्ली (साई हरियाणा-हिसार ) मध्ये निवड झालेल्या हुजेफ अपराध ने सांगली येथे नुकत्याच झालेल्या ३३व्या राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत पुणे शहर संघाकडून प्रतिनिधीत्व करत ६०-६३ किलो वजनी गटात अकोला सिटीच्या केदार कुकडे याचा दणदणीत पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
तसेच हर्ष हणमघर याचीही साई (हरियाणा- हिसार ) एथे निवड झाली. हुजेफ पुणे सातारा रोड. नातू बाग येथे राहात असून 11 वी मध्ये शिकत आहे. त्याने एम आई जी एस बाँक्सिग क्लब मधून बाॅक्सिंगला सुरुवात केली. नुकतीच त्याची साई मध्ये निवड झाली असून सद्या तो एम आय जी एस बाॅक्सिंग क्लबमध्ये उमेश जगदाळे, मृणाल भोसले, जयदीप नीलवर्ण, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तर पुढील सरावासाठी तो हरियाणाला रवाना होत आहे.
हुजेफ बरोबर सनी कापसे याने ७५-८० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले, प्रथमेश बिडकर याने ४४-४६ गटात रौप्यपदक तर अथर्व बिडकर याने ४६-४८ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. एम आय जी एस बाॅक्सिंग मधील खेळाडूंनी अप्रतिम असा खेळ करत दोन सुवर्णपदक, दोन रौप्य पदक, दोन कांस्य पदक अशी एकुण सहा पदके पटकावली.
