सुमंगलाबेन कांकरीया यांच्या हस्ते उद्घाटन : १४४ लोकांनी घेतला सहभाग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : जैन सोशल फाउंडेशनचे आनंदऋषी नेत्रालय अंतर्गत श्री वर्धमान जैन स्थानक बार्शी व लिओ क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या शिबिरामध्ये १४४ लोकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मोफत नेत्र तपासणी हे शिबीर आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येणार आहे. “समाजाच्या घटकापर्यंत पोहचून त्यांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. डोळे हा शरिराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. दृष्टी निर्दोष असेल तरच आपण सुंदर सृष्टी पाहू शकतो. त्यामुळे डोळ्यांची अत्यंत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे वर्धमान जैन स्थानक संचालक व लिओ क्लबचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.”
या ठिकाणी मोफत नेत्रतपासणी करून अत्यंत अल्पदरात ऑपरेशन करून लेन्स बसवने व काळा चष्मा देणे तसेच मोफत औषधे, नगर येथे जाण्या येण्याची व्यवस्था, भोजन व राहण्याची मोफत सोय करण्यात येते. आनंदऋषी नेत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी सुशिल गाडेकर यांनी सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन सुमंगलाबेन कांकरीया यांच्या हस्ते करण्यात आले व श्री वर्धमान जैन स्थानकचे ट्रस्टी अशोक कुंकुलोळ, भारत कोटेचा तसेच जैन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ, रुपेश कांकरीया, आनंद पुनमिया, सुजित गुंदेचा, प्रमोद भंडारी, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, जवाहर माडेकर, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या शिबीराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लिओ क्लबचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, सचिव आदित्य सोनिग्रा, यश मेहता, अक्षीत परमार, गौरव देडीया, एकता लाहोटी, सलोनी भाटे, स्नेहल कुंकूलोळ, सायली श्रीश्रीमाळ, विधी कोठारी, वत्सल राठोड, स्वराज लोखंडे, श्रेणीक गुंदेचा, ऋषभ गुंदेचा यांनी परिश्रम घेतले.