उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : कोंढवे धाडवे येथे २० जानेवारी रोजी घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील रामनगरमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
कोंढवे धावडे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्रासह वाढदिवसाला मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी पाठलाग करून शिवीगाळ करीत पिस्टलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या लोकांना दमदाटी करून वीटा फेकून मारल्या. उत्तमनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
