बारामती पोलिसांत फिर्याद : दोन दिवसांपासून कर्तव्यावर होते अनुपस्थित
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बारामती शहरातील महावितरणच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असून, गेल्या 2 दिवसांपासून ते कामावर आले नव्हते.
मनीष माधवराव दंडवते (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरातील उर्जा भवन कर्मचारी वसाहतीमध्ये ते रहावयास होते. घरातच गळफास घेवुन त्यांनी जीवन संपवले आहे. आज सकाळच्या सुमारास डबेवाला त्यांना डबा देण्यासाठी आला. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही.
डबेवाल्याने खिडकीतुन आत पाहिले असता त्यांना दंडवते यांनी दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे दिसले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
