हडपसर पोलिसांत फिर्याद : जुन्या म्हाडा कॉलनीमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चॉकलेट देण्याचा बहाणा करुन एका चार वर्षाच्या मुलीला घरात बोलावून तिच्या अंगावरुन हात फिरवून लैंगिक सतावणूक करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील जुनी म्हाडा कॉलनीत घडला.
या प्रकरणी एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आरोपीने शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता घरात बोलावले. तिला मांडीवर बसवून तिच्या फ्रॉकच्या आत हात घालून तिच्याबरोबर लैंगिक चाळे केले. तसेच गालावर, पोटावर पप्प्या घेऊन तिचा विनयभंग केल्याचा लांच्छनास्पद प्रकार केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करीत आहेत.
















