सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीत झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख ४९ हजार २०० रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीमध्ये ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेले.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीमध्ये प्रवीण महामुलकर यांच्या फ्लॅटचा दरवाजा चोरट्याने तोडून घरातील दोन लाख ४९ हजार २०० रुपयांचे दागिने चोरून नेले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे पुढील तपास करीत आहेत.
















