अलंकार पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, ४५ हजार रुपयांच्या दोन मोपेड जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोपेड गाड्या चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडून अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून दोन मोपेड ४५ हजार रुपये किमतीच्या हस्तगत केल्या.
अलंकर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती तपास पथकातील अंमलदार धीरज पवार व नितीन राऊत यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलास चोरीस गेलेल्या मोपेडसह सापळा रचून पकडून ताब्यात घेतले असता, त्याने मोपेड चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासामध्ये अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, पोलीस अंमलदार सागर केकाण, निशिकांत सावंत, धीरज पवार, हरिष गायकवाड, शरद चव्हाण, आशिष राठोड, शशिकांत सपकाळ, अजिनाथ खेडकर व नितीन राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.